Engaging multimedia presentations bring heritage to life through documentaries, films, and virtual tours. These programs offer immersive experiences, perfect for educational institutions and cultural enthusiasts.
मंदिरांचे अंतरंग उलगडून दाखवणारा दृक श्राव्य (Audio Visual) कार्यक्रम
सादरकर्ते
इंद्रनील सदानंद बंकापुरे
आपला भारत हा संस्कृतीने नटलेला आणि गोष्टींनी बांधलेला देश आहे!
भारताबरोबरच इजिप्त, रोम, पर्शिया, पेरू, इत्यादी देशांमध्ये वेगवेगळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि काळाच्या ओघात त्या नष्ट पण झाल्या. या संस्कृतींमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या देवता, शिल्प, मंदिरांचे आणि संस्कृतीचे अवशेष हे फक्त आता संग्रहालयात बघायला मिळतात. भारतात ज्या सांस्कृतिक विचारसरणीचा उगम आणि विस्तार झाला त्या मंदिर आणि मूर्ती रूपाने आजही आपण अनुभवतो आहोत आणि आपल्या समाजव्यवस्थेच्या केंद्रस्थानी ही मंदिरे आहेत.
या मंदिरांचा उगम कसा आणि का झाला? एवढी भव्य मंदिरे कुणी बांधली? भारतीय कला म्हणजे नक्की काय? या मंदिरात असणारी शिल्पं आपल्याशी काय बोलतात? आपल्या देवता विज्ञानाशी कशा पद्धतीने जोडल्या गेल्या आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायचा केलेला प्रयत्न म्हणजे "मंदिरांच्या देशा" हा कार्यक्रम.
या दृक - श्राव्य (ऑडिओ व्हिज्युअल) कार्यक्रमात अनेक मंदिरांची, तिथल्या शिल्पांची भ्रमंती करून येणार आहोत. हा कार्यक्रम बघून जेव्हा कुणी आपली वारसा स्थळे बघायला जाईल तेव्हा त्यांना त्या जागा बघण्याचा, समजून घेण्याचा वेगळा अनुभव मिळेल यात शंका नाही.